Home घडामोडी अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये ‘ब्राऊन आहा’ डे सोबत ‘हादगा’ सण साजरा

अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये ‘ब्राऊन आहा’ डे सोबत ‘हादगा’ सण साजरा

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये ‘ब्राऊन आहा’ डे सोबत ‘हादगा’ सण साजरा करण्यात आला. मुलांना रंगांचे ज्ञान मिळण्याच्या हेतूने ‘आहा डे’ साजरा करण्यात आला. त्याचबरोबर लोप पावत असलेला ‘हादगा’ सण स्कूलमध्ये मोठ्या उत्साहाने अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

हत्तीचे चित्र,खेळण्यातले हत्ती त्याच्याभोवती मुलांच्या आवडीचे खाऊचे डबे त्याच्या भोवती मुलांचे मोठे रिंगण करत विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद यांनी पारंपारिक हादग्याची गीते गायली. तसेच या निमित्ताने श्लोका स्पर्धा देखील घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका पूजा पाटील,समन्वयक विमल वांद्रे तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होता.

Related Posts

Leave a Comment