Home सामाजिक …अन्यथा महामंडळाची एकही बस गावातून सोडणार नाही : ‘वडरगे’ ग्रामस्थांचा एस.टी.महामंडळाला ईशारा..!

…अन्यथा महामंडळाची एकही बस गावातून सोडणार नाही : ‘वडरगे’ ग्रामस्थांचा एस.टी.महामंडळाला ईशारा..!

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : वडरगे(ता-गडहिंग्लज) येथील विद्यार्थांसाठी सकाळी चालू केलेली गडहिंग्लज-बहिरेवाडी बस फेरी सुरळीत चालू ठेवावी व कोल्हापूरला जाणाऱ्या काही गाड्या वडरगे मार्गे सोडाव्यात अन्यथा महामंडळाची एकही बस गावातून सोडणार नाही असा ईशारा वडरगे ग्रामस्थ व शिवसेनेने एस.टी महामंडळाला निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हंटले आहे की गेल्या एक महिन्यापासून कोल्हापूरला जाणाऱ्या (व्हाया वडरगे) बस फेऱ्या बंद आहेत. तसेच १५-२० दिवसापासून गावातून सकाळी जाणारी गडहिंग्लज-बहिरेवाडी कॉलेज बस बंद केली आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांची व नागरिकांची गैरसोय होत असून कॉलेज बस व कोल्हापूरला जाणाऱ्या बस फेऱ्या महामंडळाच्या व्यवस्थापनाने सुरळीत चालू कराव्यात अन्यथा महामंडळाची एकही बस गावातून सोडणार नाही.

निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य अजित खोत,महादेव मोरे,किरण वडर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण माने,संतोष आडावकर,सुशांत इळके,प्रशांत मोरे,नामदेव रक्ताडे,अरविंद आडावकर,दिपक चव्हाण,उत्तम गोरूले,कपिल पाटील यांच्या सह्या आहेत.

Related Posts

Leave a Comment