गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लजमध्ये इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ‘ईद-ए-मिलाद’ मंगलमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. याप्रसंगी ‘जशन ए, ईद-ए मिलादुन्नबी, जिंदाबाद’ च्या घोषणा देत जुलूस अर्थात प्रभात फेरी सुन्नी जुम्मा मस्जिद ते मेन रोड, दसरा चौक, लक्ष्मी मंदिर रोड,नेहरू चौक,शिवाजी चौक,मुल्ला मशीद ते मुख्य बाजारपेठ,वीरशैव चौक मार्गे काढण्यात आली. रॅलीची सुरुवात पोलीस निरीक्षक दिलीप घुगे व बसवराज खणगावे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
तिरंगी फुगे तसेच पैगंबरांची डोक्यावरील पगडी हातातील काठी व खांद्यावरील काळे घोंगडे याची उत्तम व आकर्षक प्रतिकृतीची सजवलेली ट्रॅक्टर तसेच इस्लामिक झेंडे प्रभात फेरीचे मुख्य आकर्षण ठरले. तर यावेळी नाथपठण,कलमापठण व सलाम नदीमबाबा शेख,अमीरअली मुजावर,सलीम खलीफ,हबीब मकानदार,सायान पठाण,आयान खलीफ,शाहरुख मुल्ला इत्यादींनी केले. आंबेडकर भवन येथे रॅलीच्या समारोप प्रसंगी मौलाना मेहमूद रजा यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी,राष्ट्राच्या उद्धारासाठी,सामाजिक सलोखा,शांतता,प्रेम,सहिष्णुता,सुख समृद्धी यासाठी तसेच पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी विशेष सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रेसिडेंट मंजूर मकानदार उपाध्यक्ष ताहीर कोचरगी, सेक्रेटरी इरशाद मकानदार,खजिनदार अल्ताफ शानेदिवान यांचे मार्गदर्शनाखाली नूर अत्तार रफिक पटेल,गौस मकानदार,परवेज शेख, फिरोज मनेर,जावेद खलिफा यांनी केले. तर आभार आशपाक मकानदार यांनी मानले.