Home आरोग्य ऐनापुरात नेत्रदानाने गाठले दशक : आभाळाइतक्या दुःखातही ‘जाधव’ कुटुंबाने घेतला नेत्रदानाचा निर्णय

ऐनापुरात नेत्रदानाने गाठले दशक : आभाळाइतक्या दुःखातही ‘जाधव’ कुटुंबाने घेतला नेत्रदानाचा निर्णय

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे नेत्रदानाने दशक गाठले. चंद्रकांत लक्ष्मण जाधव (वय ६५) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. चळवळीतील हे ९६ वे नेत्रदान ठरले तर आभाळाइतक्या दुःखातही ‘जाधव’ कुटुंबाने नेत्रदानाचा निर्णय घेतला.

चंद्रकांत जाधव यांना सोमवारी (ता.२५) सायंकाळी हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारासाठी तातडीने हलविले होते. पण, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. गावातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी नेत्रदानाबाबत चर्चा केली. कुटुंबीयांनी संमती दिल्यानंतर येथील अंकुर आय बँकेच्या पथकाला पाचरण करण्यात आले. या पथकाने ऐनापूर येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. ऐनापूर गावातील हे दहावे नेत्रदान ठरले.

चंद्रकांत जाधव यांच्या मागे पत्नी, मुलगा,दोन मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे. उद्या (ता.२७) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे.

Related Posts

Leave a Comment