Home सामाजिक श्री.गणराया अॕवाॕर्डचे शनिवारी वितरण : राष्ट्रवादी काँग्रेस व मुश्रीफ फौंडेशनचे गडहिंग्लज येथे आयोजन

श्री.गणराया अॕवाॕर्डचे शनिवारी वितरण : राष्ट्रवादी काँग्रेस व मुश्रीफ फौंडेशनचे गडहिंग्लज येथे आयोजन

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज शहरातील गणेश मंडळांना गणराया अॕवाॕर्ड २०२२ चे वितरण शनिवार(ता-२) रोजी सायंकाळी साडे चार वाजता गडहिंग्लज नगर परिषदेच्या शाहू सभागृहांमध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते होणार आहे.

मागील वर्षी २०२२ मध्ये कागल विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार हसनसो मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने श्री.गणराया अॕवाॕर्डचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये
1)उत्कृष्ट श्री.गणेश मूर्ती,श्री गणराया अॕवाॕर्ड.
2)उत्कृष्ट सजिव देखावा,श्री. गणराया अॕवार्ड.
3) उत्कृष्ट तांत्रिक देखावा,श्री. गणराया अॕवाॕर्ड.
4) उत्कृष्ट सामाजिक कार्य, श्री. गणरायाअॕवाॕर्ड.
असे चार विभाग करून प्रत्येक विभागास प्रथम क्रमांक (रोख -११०००/-)द्वितीय क्रमांक (रोख-७०००/-)तृतीय क्रमांक (रोख-५०००/-)व उत्तेजनार्थ (रोख-३०००/-)
अशी अनुक्रमे बक्षिसे देण्यात येणार आहेत.

मागील वर्षी श्री.गणराया अॕवाॕर्ड परीक्षण समिती गठीत करून समिती मार्फत गडहिंग्लज शहरातील सर्व मंडळांचे परीक्षण करून नंबर काढण्यात आले आहेत. समितीमध्ये प्राचार्य डॉ.पी.जी चिगळीकर,प्राचार्य डॉ.रंगराव होडगे,गणपतराव पाटोळे,अमोल शेडबाळे,सुरेश दास,रफिक पटेल,अरविंद बारदेस्कर यांनी परीक्षण केले आहे.यामध्ये प्रत्येक विभागात नंबर आलेल्या मंडळांची नावे शनिवारी होणाऱ्या श्री.गणराया अॕवाॕर्ड कार्यक्रमात जाहीर केली जातील.गडहिंग्लज शहरातील सर्व गणेश मंडळांनी श्री.गणराया अॕवाॕर्ड कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ फौंडेशनचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी केले आहे.

Related Posts

Leave a Comment