गडहिंग्लज प्रतिनिधी : युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून उद्योजक सुनिल चौगुले यांनी होतकरू खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन दिले. युवा, कुमार फुटबॉलपटूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. गडहिंग्लजची फुटबॉल पंरपंरा टिकावी यासाठी योगदान दिले. त्यासाठी त्यांच्या स्मुती फुटबॉल क्षेत्रात जपण्याचा निर्णय येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत सुनिल चौगुले यांच्या शोक सभेत घेण्यात आला. एम आर. हायस्कुलच्या मैदानावर हि सभा झाली.
भुपेंद्र कोळी यांनी स्वागत केले. गडहिंग्लज युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात सुनिल चौगुले यांच्या फुटबॉलक्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. आजरा साखर कारख्यान्याचे अध्यक्ष सुनिल शिंत्रे म्हणाले, स्पर्धा असो कि खेळाडूंचा सराव नव्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल याकडे त्यांचा कटाक्ष होता. दिवाळीतील राष्ट्रीय स्पर्धा समाज माध्यमाचा प्रभावी वापर करत देशभर पोहचवली. त्यांची स्वप्ने पुर्ण करणे हिची श्रध्दाजंली ठऱेल. युनायटेडचे संचालक अऱविंद बार्देस्कर म्हणाले, कोणतीही जवाबदारी घेतली की झोकून देऊन काम करण्याची त्यांचा स्वभाव आदर्श होता.
संभाजी शिवारे म्हणाले, सकारात्मक दुष्टीकोनातून गडहिंग्लज प्रिमियर लिगमध्ये संघाची मालकी घेऊन त्यांनी सतत नवोदित फुटबॉलपटूंना प्रोत्साहन दिले. आपण सर्वांनी फुटबॉल क्षेत्रात त्यांच्या नावाने उपक्रम सुरु करून स्मुती जपूया. अँड. सतिश इटी म्हणाले, सुनिल चौगुले यांच्या कार्याचा वारसा असाच चालू ठेवूया.
यावेळी एक मिनिट स्तबध्दता पाळून श्री.चौगुले यांना आदराजंली अर्पण करण्यात आली. यावेळी युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद,मनिष कोले, प्रशांत दड्डीकर,विजय पाटील,प्रविण पाटील,उमेश देवगौंडा,सौरभ जाधव यांच्यासह पालक, खेळाडू उपस्थित होते. मनिष कोले यांनी आभार मानले.