Home Uncategorized वडरगेमध्ये उद्या चित्रकला,टॅलेंटहंट व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

वडरगेमध्ये उद्या चित्रकला,टॅलेंटहंट व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : वडरगे(ता-गडहिंग्लज) येथे वडरगे स्पोर्ट्स क्लब मार्फत १४ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला,टॅलेंटहंट व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन उद्या(बुधवार)सकाळी १० वाजता विद्या मंदिर वडरगे येथे करण्यात आले आहे.

चित्रकला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक २२२२/- द्वितीय क्रमांक ११११/- टॅलेंटहंट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ३३३३/- द्वितीय क्रमांक २२२२/- तर बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ५००१/- द्वितीय क्रमांक ३००१/- अशी अनुक्रमे बक्षिसे,सोबत चषक व स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहे.इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी नोंदवावा असे आवाहन संजय मोरबळे(मो.९५५७९४५४६७) यांनी केले आहे.

Related Posts

Leave a Comment