गडहिंग्लज प्रतिनिधी : एमआयडीसी गडहिंग्लज येथील साई एज्युकेशन सोसायटी संचलित साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कोर्सेसचा शनिवारी(ता-३) वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दुपारी चार वाजता शुभारंभ होणार आहे. सदरचा शुभारंभ सोहळा डॉ.नागेश पट्टणशेट्टी,डॉ.रविंद्र हत्तरगी,डॉ.बी.एस.पाटील,डॉ.पी.पी.पाटील,उदयराव जोशी,प्रकाशभाई पताडे,हेमंत कोलेकर,राकेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
गडहिंग्लज विभागात साई एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आम्ही उल्लेखनीय काम करत ‘वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात’ नर्सिंग कोर्सेसच्या माध्यमातून एन्ट्री करीत आहोत तरी शनिवारी होणाऱ्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सतिश पाटील,उपाध्यक्ष बाळासाहेब घुघरी,संचालक तुषार पाटील व प्राचार्य सुधींद्र जवळी यांनी केले आहे.