गडहिंग्लज प्रतिनिधी : पक्षांचा अधिवास टिकवणे ही काळाची गरज आहे. असल्याचे मत डॉ.शरद वडतकर यांनी व्यक्त केले. येथील डॉ. घाळी महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागामार्फत आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी डॉ.शरद वडतकर म्हणाले की पक्षी आपल्या परीसंस्थेमध्ये परागीभवन, बिजप्रसार,कीटक-नियंत्रण,स्वच्छता आणि आरोग्य यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात तसेच ते परिसंस्थेचे सूचक म्हणून काम करतात, त्यामुळे निसर्गाच्या शाश्वत संवर्धनासाठी पक्षांचा अधिवास टिकवणे गरजेचं आहे असे प्रतिपादन मेळघाट संवर्धनामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ.शरद वडतकर यांनी केले.

कार्यक्रमास कोल्हापूर येथील पक्षीमित्र रवींद्र अष्टेकर,पक्षी छायाचित्रकार अनिल वेल्हाळ,पक्षीमित्र अनंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते. तर विभागप्रमुख प्रा.महेश कदम यांनी प्रास्ताविक केले प्रा.निखिल घुळन्नावर यांनी आभार मानले.



