Home Uncategorized गडहिंग्लज युनायटेड स्कुलला विजेतेपद;सांगली ग्रासरूट फुटबॉल लीग:कोल्हापुर चॅम्पियन्स अकादमीवर मात

गडहिंग्लज युनायटेड स्कुलला विजेतेपद;सांगली ग्रासरूट फुटबॉल लीग:कोल्हापुर चॅम्पियन्स अकादमीवर मात

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुलच्या १५ वर्षाखालील संघाने सांगली येथे झालेल्या ग्रासरूट फुटबॉल लीगचे विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात युनायटेड स्कुलने कोल्हापूरच्या चॅम्पियन्स अकादमीवर २-० असा पराभव केला.सांगलीच्या फुटबॉल मंत्राज स्पोर्टिंग क्लब मार्फत या ग्रासरुट डेव्हलपमेंन्ट लीग स्पर्धा कै. नेमगोंडा पाटील क्रीडा संकुलात झाल्या. स्पर्धेत कोल्हापूर, सांगली जिल्हयातील आठ संघ सहभागी होते.

पहिल्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेड स्कुलने सांगलीच्या तरुण भारत एफसीचा अकादमीचा २-० असा पराभव करून विजयी सलामी दिली. युनायटेडच्या दर्शन तरवाळने संघाचे खाते उघडले. उत्तरार्धात आलोक पाटीलने संघाचा दुसरा गोल करून विजय निश्चित केला. दुस-या उपांत्य फेरीच्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेड स्कुलने कोल्हापूरच्या चँम्पियन अकदामीच्या नवोदित ब संघाचा ५-० असा मोठा पराभव केला. युनायटेडच्या दर्शन तरवाळ, आलोक पाटील,सुरज पोवार,अभिषेक सासने यांनी प्रत्येकी एक गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला.

अंतिम सामन्यात गडहिंग्लज युनायटेड स्कुलने कोल्हापुरच्याच चँम्पियन्स अकादमीच्या ‘अ’ संघावर २-० अशी मात केली. चुरशीच्या सामन्यात युनायटेडने समन्वय ठेवत सामन्यावर पकड मिळवली. सामन्याच्या ७ व्या मिनिटाला आलोक पाटीलने गोल करून श्रीगणेशा केला. उत्तरार्धात युनायटेडने आघाडी वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नात दर्शन तरवाळने मैदानी गोल करून विजेतेपद साकारले. विजेतेपद मिळवलेल्या संघाला युनायटेड असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळकी,उपाध्यक्ष सतीश पाटील आणि संचालक मंडळाचे प्रोत्साहन तर प्रशिक्षक दिपक कुपन्नावर, संघव्यवस्ंथापक प्रसाद पवार यांचे मार्गदर्शन मिळाले.

चौकट…
विजेता संघ असा…
आलोक पाटील,दर्शन तरवाळ, अनमोल तरवाळ,शुभम आडसुळे,ऋतुराज आडसुळे,स्वरूप शेटके,सुमित पनोरी,आकाश पोवार, ऋषीकेश भोसले,समर्थ पोवार,अनस नांगनुरे,विवेक कश्यप,सुरज पोवार,अभिषेक सासने,साईराज सरदेसाई,आर्यन पाटील.

Related Posts

Leave a Comment