गडहिंग्लज प्रतिनिधी : अत्याळ (ता- गडहिंग्लज) च्या श्री.कृष्ण सहकारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी ‘शिवाजी पाटील’ यांची तर व्हा.चेअरमनपदी ‘कृष्णा जाधव’ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक कार्यालयाकडील सहकार अधिकारी डी.बी.गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत निवडी करण्यात आल्या.


अध्यक्षपदासाठी शिवाजी पाटील यांचे नाव नारायण पाटील यांनी सुचविले तर जगदीश पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी कृष्णा जाधव यांचे नाव शिवाजी मुरुकटे यांनी सुचविले तर मारुती कदम यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक दत्तात्रय पाटील,गौतम कांबळे,संध्या पाटील,शैला माने यांच्यासह संजय पाटील,विजय बाटे, महादेव जाधव आदी उपस्थित होते. सचिव प्रकाश माने यांनी आभार मानले.



