गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा २१ ते २२ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्पर्धा उत्साहात पार पाडल्या. सदरच्या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अमोल पाटील(सर) होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत परेड द्वारे केले.
अग्नि(रेड),आकाश(ब्ल्यू),पृथ्वी(ग्रीन), त्रिशूल(यल्लो) भारतीय क्षेपणास्त्रांच्या नावांची ग्रुप बनविलेले होते. रेड,ब्ल्यू,ग्रीन,यल्लो झेंड्यांचे पूजन डॉ.अमोल पाटील(सर)यांच्या हस्ते करण्यात आले. दुर्वा कुलकर्णी या विद्यार्थिनीने खेळ सुरू करण्यास अनुमती घेतली. त्यानंतर स्वागतासाठी शिक्षिका व विद्यार्थ्यांनी मिळून बॉल ड्रिल वरती नृत्य सादर केले. त्यानंतर स्पर्धेस सुरुवात झाली. प्लेग्रुप ते यु.के.जी. ची मुले उस्फूर्तपणे स्पर्धेमध्ये भाग घेऊन खेळाचा आनंद लुटला. शाळेच्या सेंटर हेड श्रीमती विमल वांद्रे यांनी स्वागत केले तर मुख्याध्यापिका पूजा पाटील यांनी आभार मानले. सदरच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा स्टेफी बारदेस्कर,श्रद्धा पाटील,दिपाली दरेकर,धनश्री कळके,शाहीन किल्लेदार,शैला पाटील यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाल्या.