Home घडामोडी ‘न्यू व्हिजन’ कोचिंग क्लासेस मार्फत तालुका स्तरीय ‘एनएमएस’ परीक्षेला उस्फुर्त प्रतिसाद

‘न्यू व्हिजन’ कोचिंग क्लासेस मार्फत तालुका स्तरीय ‘एनएमएस’ परीक्षेला उस्फुर्त प्रतिसाद

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : ‘न्यू व्हिजन’ कोचिंग क्लासेस,गडहिंग्लज मार्फत तालुका स्तरीय ‘एनएमएस’ परीक्षेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ‘न्यू व्हिजन’ कोचिंग क्लासेस मार्फत घेण्यात आलेल्या ‘एनएमएस’ सराव परीक्षेला तालुक्यातील २७० विद्यार्थी सहभागी झाले होते.

६०००० रू शिष्यवृत्ती असलेल्या परीक्षेत पेपर कसा सोडवला पाहिजे,वेळेचे नियोजन,मानसिक स्थिरता कशी राखावी जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र व्हावेत. यासाठी सराव परीक्षेचे आयोजन केले होते. अशी माहिती आयोजक सागर पाटील यांनी दिली. परीक्षेसाठी मु.कुंभार(एम.आर. हायस्कुल)सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परीक्षेत केंद्रात प्रथम-प्रणया दळवी,द्वितीय-श्रावणी पाटील तर तृतीय क्रमांक-स्नेहल देसाई ( मुंगुरवाडी) यांनी पटकावला.

Related Posts

Leave a Comment