Home घडामोडी अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न

अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये नृत्य स्पर्धा (डान्स कॉम्पिटिशन) आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर,मराठमोळी गाणी,साउथ,बॉलीवूड,वेस्टर्न आश्या विविध गाण्यांवरती नृत्य करून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाला पालकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अमोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाळेच्या सेंटर हेड श्रीमती विमल वांद्रे यांनी स्वागत केले व मुलांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका पूजा पाटील यांनी आभार मानले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सूत्रसंचालन स्टेफी बारदेस्कर व श्रद्धा पाटील यांनी केले. तसेच दिपाली दरेकर,धनश्री कळके,शाहीन किल्लेदार,शैला पाटील यांचे सहकार्य लाभले. यावेळी अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment