Home घडामोडी सिल्वासा,खंडोबा,गडहिंग्लज उपात्यंपुर्व फेरीत तर सातारा,खानापूर, केबीआरचे आव्हान संपुष्टात : गडहिंग्लज युनायटेड ट्रॉफी

सिल्वासा,खंडोबा,गडहिंग्लज उपात्यंपुर्व फेरीत तर सातारा,खानापूर, केबीआरचे आव्हान संपुष्टात : गडहिंग्लज युनायटेड ट्रॉफी

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : युनायटेड ट्रॉफी अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी दादर नगर हवेलीचा सिल्वासा युनायटेड, कोल्हापूरचा खंडोबा तालीम मंडळ, बेळगाव युनायटेड आणि यजमान गडहिंग्लज युनायटेडने प्रतिस्पर्ध्यांचा पाडाव करून उपात्यंपुर्व फेरीत प्रवेश केला. सातारा, खानापूर आणि काळभैरी रोड फुटबॉल क्लब (केबीआर) यांचे आव्हान संपुष्टा आले. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शमनजी ग्रुप ऑफ इन्सटिट्युटतर्फे एम. आर. हायस्कुलच्या
मैदानावर हि स्पर्धा सुरु आहे.

दिवसभरात एकुण चार सामने झाले. खंडोबा तालीम मंडळाने दोन गोल करून केबीआरला हरविले. सामन्याच्या उतरार्धात खंडोबाच्या संकेत मेढे,यश जांभळे यांनी गोल केले. गडहिंग्लज युनायटेडने सातारा जिमखाना संघाचा दोन गोलनी पराजय केला. युनायटेडच्या प्रशांत सलवादे याने पुवार्धात तर सिध्दार्थ दड्डीकरने उत्तरार्धात गोल मारला. सिल्वासा युनायटेडने नवोदित बेळगावच्या बुफा अँकाडमीचा पाच गोलनी फडशा पाडला. सिल्वासाच्या यासीन नदाफने दोन गोल करून सिंहाचा वाटा उचलला. बिकसनसिंग, प्रशांतसिंग, बिकेनसिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.

शेवटच्या सामन्यात बेळगाव युनायटेडने खानापूर एफसीचा टायब्रेकरमध्ये ५-३ अशी मात केली. निर्धारित वेळेत सामना गोलशुन्य बरोबरीत होता.बेळगावच्या करण माने,धनजंय माने,ओमकार शिंदे,शुभम देसाई यांनी तर खानापूरच्या आदर्श कोलेकर,वैभव ठोंबरे,महेश परिट यांनाच गोल करता आला. लिकसनसिंग,संकेत मेढे,अनिकेत कोले,ओम कदम यांना
सामनावीर तर मोनीसन,महेश जगताप,यश मर्ढेकर,राहूल पंतोजी यांचा लढवय्या म्हणून सत्कार झाला.

उद्याचे सामने…
१)सिल्वासा युनायटेड वि. सेसा अँकाडमी, गोवा. सकाळी ७.३० वा.
२)खंडोबा तालीम वि. एमवायजे, जीएमएसी क्लब, मुंबई
३)गडहिंग्लज युनायटेड वि. सेंट्रल एक्साईज, केरळ
४)बेळगाव युनायटेड वि. गोवा एफसी, गोवा.

Related Posts

Leave a Comment