गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या प्रधानमंत्री कौशल्य दौड मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात भावकु साळुंखे तर महिला गटातून अस्मिता पाटील याने प्रथम क्रमांक पटकावले प्राचार्य स्वानंद देवधर यांच्या अध्यक्षतेखाली व गटनिदेशक राजेंद्र झुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा झाल्या.
सदरच्या स्पर्धेत तीनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पुरुष गटात सागर धनगर, अभिषेक कांबळे महिला गटातून प्रिती शिंदे, पूजा शिंदे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले यशस्वी स्पर्धकाचा मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. पंच म्हणून संपत सावंत व बी.जी. कुंभार यांनी काम पाहिले.
यावेळी डॉ.श्रीकांत हेब्बाळकर,प्रा.बी.एस.काटे, प्रा.जी.ए.खंदारे,प्रा.एस.बी. हत्ती,प्रा.के.के.वाघमोडे,प्रा.मारुती पाथरवाड,प्रा.ए.जी.देशमुख, प्रा.एस.बी.मुसाई, प्रा.बी.व्ही,बनसोडे,प्रा.बी.बी.ममदापूरे,प्रा.पी.ए.परीट,प्रा. जी.बी.पाटोळे यासह जागृती व साधना व्होकेशनल विभाग व आयटीआय मधील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.