गडहिंग्लज प्रतिनिधी : महागाव (ता- गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयातील अंतिम वर्षाचा निकाल ९९ टक्के लागला. नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ही परीक्षा घेतली. महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनची पहिलीच तुकडी पदवी घेऊन बाहेर पडली असून उत्कृष्ट निकालामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यामध्ये प्रथम पुष्पांजली हांडे (73.27 ),द्वितीय अनुराधा स्वामी (७१.५४), तृतीय सौरभ खेलवाडे (७१ )टक्के गुण मिळवीत क्रमांक पटकावले. यासाठी प्राचार्या डॉ.मंगल मोरबाळे व शिक्षकांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष ॲड.अण्णासाहेब चव्हाण, विस्वस्थ डॉ.यशवंत चव्हाण,डॉ.संजय चव्हाण,ॲड.बाळासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले.