Home Uncategorized वडरगेत विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

वडरगेत विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : वडरगे(ता-गडहिंग्लज) येथे आज सकाळी गावातील हजारे यांच्या विहिरीत पाय घसरून पडून बुडून मृत्यू झाला असून चंद्रकांत लक्ष्मण पोटे(वय-४४) असे त्याचे नाव आहे.

पोलिसा कडून मिळलेली अधिक माहिती अशी की चंद्रकांत पोटे हा चुलत भाऊ सुभाष पोटे यांची गावातील वरतीकडील नावाची शेती करत होता. तर आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान चंद्रकांत शेताकडे गेला होता. त्यावेळी तो शेजारी असणाऱ्या हजारेंच्या विहिरीमध्ये पाणी आणनेसाठी गेला तेव्हा पाय घसरून पाण्यात पडून बुडून मयत झाला. सदरची घटना विहीर मालक दिगंबर हजारे यांना समजले नंतर त्यांनी चुलत भाऊ सुभाष पोटे यांना सांगितले असता गावातील लोकांनी व राहुल कारंडे याच्या रेस्क्यू टीमने विहीरीत गळ टाकून एकच्या दरम्यान विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. चंद्रकांत यांच्या पाश्चात्य आई,पत्नी दोन मुले असून अधिक तपास गडहिंग्लज पोलीस करीत आहेत.

Related Posts

Leave a Comment