गडहिंग्लज प्रतिनिधी : अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आजी-आजोबांचा दिवस म्हणून “एक दिवस स्वतःसाठी लहान होऊन जगण्यासाठी” या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथम आजी आजोबांचे स्वागत करण्यात आले. चिमुकल्यांनी आपल्या आजी आजोबांचे स्वागत नृत्यातून केले तसेच आजी आजोबांना ग्रेटिंग कार्ड्स देऊन त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त केले. त्यानंतर आजी-आजोबांचे पाय पूजन करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले. आपल्या मातृंडांचे कौतुक बघून आजी-आजोबा गहिवरले. आजी-आजोबा व नातृंडांविषयी बऱ्याच आजोबा आजींनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणवले ‘तो’ सोहळा खूपच हृदयस्पर्शी झाला. “एक दिवस स्वतःसाठी लहान होऊन जगण्यासाठी” या संकल्पनेतून आजी-आजोबांसाठी छोटे खेळ ठेवण्यात आले होते ते खेळताना त्यांना बालपण आठवले. तसेच त्यांनी सामूहिक नृत्यही सादर केले. असा आजी-आजोबांसाठीचा कार्यक्रम आपण आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले. आमच्या नातृंडांमध्ये जी प्रगती झालेली आहे त्याबद्दल शाळेविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. आम्हाला शाळेमध्ये बोलावून सत्कार केल्याबद्दल धन्यवाद मानले.
प्रस्तावना व स्वागत समन्वयक श्रीमती विमल सुखदेव वांद्रे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका पूजा पाटील यांनी मानले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.अमोल पाटील यांनी सर्व आजोबा आजींचे निरोगी आयुष्य तसेच दीर्घायुष्य लाभो आशा शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाफ उपस्थित होता.