गडहिंग्लज प्रतिनिधी : अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये प्री प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वयोगटानुसार विविध कलागुणांचा विकास व्हावा यासाठी गायन स्पर्धा (सिंगींग कॉम्पिटिशन) आयोजित करण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी कोरियोकेचा वापर करून गायनाची आपली कला सादर केली. गायन स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना लय,ताल,संगीत यांचे ज्ञान मिळाले. विद्यार्थ्यांनी बॉलीवूड तसेच देशभक्तीपर गीते, पोवाडा,भावगीते यातून आपली गायन कला सादर केली. मुख्याध्यापिका तसेच स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अमोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन स्टेफी बारदेस्कर यांनी केले. श्रद्धा पाटील तसेच दिपाली दरेकर यांनी पर्यवेक्षक म्हणून कार्य केले. धनश्री कळके, शाहीन किल्लेदार यांचे सहकार्य लाभले. सेंटर हेड श्रीमती विमल वांद्रे विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार मानले तर यावेळी अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
गायन स्पर्धेत विजेत्या विद्यार्थी खालील प्रमाणे..
प्ले ग्रुप क्लास:-
- अधिरा बेंद्रे व विराज पाटील
- इंद्रनील पट्टणशेट्टी व नायसा शेलार
- शौमिका इंगळे
नर्सरी क्लास:-
- अहिल्या हिडदुग्गी, अधिराज रेडेकर व रणवीर यादवाडे.
- कार्तिकेय व्हटकर, राया पाटील व द्रिशा जैन.
- ऋग्वेद पाटील, अर्णव पाटील व श्रेयांश मेंडूले
एल. के. जी क्लास :-
- अर्जुन पाटील, दक्ष शिंदे, शौर्या सरदेसाई व शौर्या पोवार.
- स्वराली पट्टणशेट्टी, आदिराज देसाई, देवांश किल्लेदार व आरवी शिवुडकर.
- परिणीता जगताप, श्रीतेज अर्दाळकर, प्रद्निक पोवार.
यु. के. जी क्लास:-
- नायशा पाटील.
- दूर्वा कुलकर्णी.
शिवांश नायकवडी व विहान पोवार.
अभिनंदन