कागल प्रतिनिधी : नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन,कागल यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गडहिंग्लज,आजरा,कागल तालुक्यातील आदर्श शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये आजरा तालुक्यातून व्यंकटराव हायस्कूल आजरा येथील विज्ञान व गणित विषयाचे सहाय्यक शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा कागल येथील मटकरी हॉल येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ,खासदार संजय मंडलिक,आ. विक्रम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
स्पर्धा परीक्षा तज्ञ मार्गदर्शक,विज्ञान प्रदर्शन,तज्ञ मार्गदर्शक,ई.व्ही.एम.मशीन मास्टर व ट्रेनर,सूत्रसंचालक,शाळा सिद्धि उपक्रमामध्ये राज्य निर्धारक,राष्ट्रीय,राज्य व जिल्हा स्तरावरील प्रशिक्षणात कृतीयुक्त सहभाग,२००७-०८ मध्ये सह्याद्री दूरचित्रवाहिनी व स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘हा खेळ शब्दांचा’ या कार्यक्रमांमध्ये सहभाग आशा शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक, उपक्रमशीलता व क्रीडा क्षेत्रातील अष्टपैलू कार्याची दखल घेऊन नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार विक्रम काळे,खासदार संजय मंडलिक, नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते प्रशांत गुरव यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी माजी आमदार संजयबाबा घाटगे,आ.जयंत आसगावकर,युवराज पाटील (बापू), शिक्षक नेते दादासाहेब लाड,प्रताप उर्फ भैय्या माने,नवीद मुश्रीफ, विकास पाटील,दीपक देसाई,वसंतराव धुरे,दिनकर कोतेकर,प्रकाश गाडेकर,राजेंद्र माने,प्रवीणसिंह पाटील,गणपतराव फराकटे,सतीश पाटील,शशिकांत खोत,मनोज फराकटे,रमेश तोडकर,जयदीप पवार,काशिनाथ तेली,बाळासो तुरंबेकर,प्रवीण भोसले,बळवंतराव माने,सूर्यकांत पाटील,गणपतराव कमळकर,सतीश घाळी,प्राचार्य राजेंद्र कुंभार,मदन देसाई,रविंद्र देसाई,विठ्ठल चौगुले,संजय भोये उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर प्रशांत गुरव म्हणाले की मला मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारामुळे भविष्यात सर्वोत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. तर आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व सर्व संचालक मंडळ यांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. प्राचार्य आर.जी.कुंभार,पर्यवेक्षिका शेलार मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले.