Home आरोग्य ‘डॉ.अजिंक्य चव्हाण’ यांची डी.फार्मसीच्या प्राचार्यपदी नियुक्ती

‘डॉ.अजिंक्य चव्हाण’ यांची डी.फार्मसीच्या प्राचार्यपदी नियुक्ती

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : महागाव (ता- गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज फार्मसी पदवीच्या (डी फार्मसी) प्राचार्यपदी डॉ.अजिंक्य बाळासाहेब चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. संस्था समूहामार्फत निवडीचे पत्र नुकताच प्रदान करण्यात आले.

डॉ.अजिंक्य चव्हाण यांनी आठ वर्षे शिक्षक व विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच तीन संशोधन प्रबंध व सातहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकातून लेख प्रसिद्ध केले आहेत. निवडीबद्दल विविध स्तरावर डॉ.चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष ॲड.अण्णासाहेब चव्हाण,डॉ.संजय चव्हाण,डॉ.यशवंत चव्हाण,रजिस्टार शिरीष गणाचार्य,डॉ.अन्सार पटेल,डॉ.मंगल मोरबाळे,डॉ.एस.एच.सावंत,प्रा.आर.एस.पाटील,डॉ.श्रीकांत हेब्बाळकर,प्रा.सुधिंद्र जवळी,प्रा.डी.बी.केस्ती,अंकुश सावंत,अजित भुईंबर,अनिल पाटील,सुहास सावंत,सचिन हिरेमठ,सचिन पाटील,निलेश करडे यांच्यासह विविध विभागातील शिक्षक,कर्मचाऱ्यांनी व राजकीय मान्यवरानी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले.

Related Posts

Leave a Comment