गडहिंग्लज प्रतिनिधी : अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस तथा विविध वेशभूषा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्ती,ऐतिहासिक,सामाजिक,पर्यावरण तसेच तंत्रज्ञान व इतर अनेक विषयानरूप वेशभूषा परिधान करून रॅम्प वॉक करत सादरीकरण केले. तसेच मनोगत व्यक्त करत आपली कला सादर केली. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धा अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अमोल पाटील (सर) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या तर यावेळी मुख्याध्यापिका पूजा पाटील यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टेफी बारदेस्कर व श्रद्धा पाटील यांनी केले. सदरच्या स्पर्धा सुप्रिया पाटील, दिपाली दरेकर,धनश्री कळके,शाहीन किल्लेदार यांचे सहकार्यातून संपन्न झाल्या. श्रीमती विमल वांद्रे यांनी आभार मानले. तर यावेळी अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.