Home कृषी आजरा तालुक्यासह ‘त्या’ शेतकऱ्यांना ‘बंदूक’ परवाना द्या : शिवसेनेची मागणी

आजरा तालुक्यासह ‘त्या’ शेतकऱ्यांना ‘बंदूक’ परवाना द्या : शिवसेनेची मागणी

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गेली अनेक वर्षांपासून आजरा,चंदगड व गडहिंग्लज तालुक्यात हत्ती,गवे व अन्य वन्य प्राण्यांचा उपद्रव चालू आहे. वनखात्याने ‘या’ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा तसेच जंगला शेजारी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेती संरक्षक बंदूक परवाना मिळावा आशा इतर मागण्या कोल्हापूर वन विभागाकडे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज निवेदनाद्वारे केल्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की अनेक वर्षापासून गडहिंग्लज,आजरा,चंदगड तालुक्यामध्ये हत्ती,गवे व अन्य वन्य प्राण्यांचा उपद्रव चालू आहे. यामध्ये गव्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच २८ ऑक्टोंबर रोजी आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे हत्तीच्या हल्ल्यात एक वन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तरी देखील हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी वन खात्यामार्फत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाहीत. तसेच गडहिंग्लज विभागांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान वनप्राण्यांच्यामुळे होत आहे. वन्य प्राण्यांच्या पासून झालेल्या नुकसानीची भरपाई ही तुटपुंजी मिळते. त्यामुळे येथील शेतकरी हवालदील झाला आहे.

मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी,’त्या’ कर्मचाऱ्याला वन शहीद दर्जा लवकरात लवकर मिळावा, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ होऊन बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी,जंगला शेजारी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना आपला जीव वाचविण्यासाठी शेती संरक्षक ‘बंदूक’ परवाना मिळावा. आजरा किंवा चंदगड तालुक्यात हत्ती संगोपन केंद्र करण्याचा जो प्रस्ताव आहे तो तत्काळ मार्गी लावावा. जंगला शेजारी शेती असलेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर सौर कुंपणांचे वाटप करावे,जंगलातील ऑस्ट्रेलियन बाभूळची झाडे तोडून त्या ठिकाणी रायवळ झाडांची लागवड करावी. अशा मागणीचे निवेदन वन विभागास देण्यात आले आहे.

निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे,उपजिल्हा संघटक संभाजी पाटील,आजरा तालुकाप्रमुख रवींद्र सावंत,युवराज पोवार,चंदगड तालुका प्रमुख अनिल दळवी,लक्ष्मण मनवाडकर यांच्या सह्या आहेत.

Related Posts

Leave a Comment