गडहिंग्लज प्रतिनिधी : हसुरवाडी (ता-गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने आयोजित मोफत आयुर्वेद व पंचकर्म शिबिराचे उद्घाटन नुल येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती सिद्धेश्वर महास्वामीच्या हस्ते करण्यात आला. स्वागत विश्वस्त डॉ.संजय चव्हाण यांनी केले.
सहा मार्चपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात सांधेदुखी,पोटविकार, केसविकार,संधिवात,शिरशूल, लठ्ठपणा,आम्लपित्त,जुनाटसर्दी, त्वचाविकार,सोरायसिस,जुनाट खोकला,गुडघेदुखी,गृधशी,मणक्याचे विकार,मानदुखी,पक्षाघात,वंध्यत्व, निद्रानाश,वात विकार,पाळीचे विकार,आमवात,श्वसन विकार यासारख्या 25 हून अधिक आजाराचे मोफत आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा करण्यात येणार आहे. याचा आज उद्घाटन महास्वामीजींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी स्वामीजींनी हॉस्पिटलच्या विविध विभागास भेट देऊन रुग्णाची विचारपूस करीत होत असलेल्या उपचाराबद्दल जाणून घेतले. दरम्यान आयुर्वेद महाविद्यालयाच्या हर्बल व नक्षत्र गार्डनला भेट देत विविध वनऔषधाची माहिती घेतली. तसेच येथील रुग्णसेवेबद्दल समाधान व्यक्त करीत अधिकाधिक रुग्णांनी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार व शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी रजिस्टार शिरीष गणाचार्य, विकास अधिकारी प्रा.डी.बी. केस्ती,डॉ.माधव पठाडे,डॉ.मंगल मोरबाळे,डॉ.संगीता मनगुळे,डॉ. धनश्री पाटील, हॉस्पिटल मधील डॉक्टर्स कर्मचारी उपस्थिती होते.