गडहिंग्लज प्रतिनिधी : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) मार्फत उद्यापासून (ता-८) गडहिंग्लज ग्रामीण लिगला प्रारंभ होत आहे. स्पर्धेत एकुण पाच संघाचा सहभाग आहे. शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर उद्यापासून तीन दिवस सायंकाळच्या सत्रात रोज दोन सामने होणार आहेत. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने स्पर्धेचे संयोजन केले आहे.
केसए मार्फत गडहिंग्लज,आजरा, चंडगड आणि भुदरगड तालुक्यातील संघासाठी ही गडहिंग्लज ग्रामीण लिग स्पर्धा घेतली जाते. उद्या दुपारी दोन वाजता या स्पर्धेला सुरवात होईल. शिवराज विदया संकुलाचे सचिव प्रा. डॉ.अनिल कुराडे यांच्या हस्ते स्पर्धेला प्रारंभ होईल. यावेळी केएसएचे स्पर्धा प्रमुख दीपक घोडके, युनायटेडचे अध्यक्ष डॉ.रविंद्र हत्तरकी,उपाध्यक्ष सुरेश कोळकी,अर्जून चौगुले हे उपस्थित राहणार आहेत. रोज दुपारच्या सत्रात दोन सामने होतील. दुपारी दोन आणि सायंकाळी साडे तीन वाजता असे दोन सामने आहेत. या स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला कोल्हापूरात वरिष्ठ गटाच्या बाद पध्दतीच्या स्पर्धांना थेट प्रवेश मिळणार आहे.
स्पर्धेतील सामने असे : शनिवार दि. (८ फेब्रुवारी) दु.२ वा. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ‘अ’ विरूध्द संयुक्त भिमनगर फुटबॉल क्लब , दु. ३.३० वा. काळभैरी रोड फुटबॉल क्लब वि. सॉकर ट्रेनिंग स्कूल. रविवार ( ९ फेब्रुवारी) दु. २ वाजता. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ‘अ’ वि. सॉकर ट्रेनिंग सेंटर. दु. ३.३० वा. संयुक्त भिमनगर फुटबॉल क्लब वि. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ‘ब’. सोमवार (ता. १०) सकाळी ७ वा. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ‘अ’ वि. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ‘ब’ सकाळी ८.३० वा. काळभैरी फुटबॉल रोड फुटबॉल क्लब वि.संयुक्त भिमनगर फुटबॉल क्लब.