गडहिंग्लज प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात विकास साधून लोकांना विविध सेवा प्राप्त होऊन बँकेच्या सेवा घरोघरी मिळाव्यात या हेतूने ग्रामीण भागातील शेतकरी,व्यावसायीक,सेवा संस्था,दूध संस्था,पतसंस्था,किराणा दुकानदार, कापड दुकानदार,गिरणी कांडप, बचतगट व अन्य घटकातील लोकांना के.डी.सी.बँक शाखा गडहिंग्लज शहर यांच्या मार्फत बँक आपल्या दारी माध्यमातून ‘क्यूआर’ कोड वाटप आज(गुरुवार) रोजी करुन सेवा सूरू करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस लिंगनुरचे अध्यक्ष अशोक कुरळे म्हणाले सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिक यांना ‘क्यूआर’ कोड काढणे बाबत सहकार्य करु. बँकेने विकास संस्थेमार्फत सेवा देणे हे एक सेवादायी कार्य आहे. तर शाखा व्यवस्थापक दिलीप शिंदे म्हणाले की लिंगनुरमध्ये बँक शेतकरी,व्यापारी,व्यावसायिक व सर्व सामान्य जनतेसाठी केंद्र बिंदू मानून ठेवी,कर्ज व इतर व्यवसाय करण्यासाठी बँक आपल्या दारी येऊन सेवा देण्याचे काम करत आहे त्याला सभासदांनी व नागरिकांनी सहकार्य करावे.
यावेळी बँकेचे तपासणी अधिकारी संजय नाईक,निरीक्षक राजदीप जगदाळे,दिलीप जाधव,के.डी.सी. बँकेचा सर्व स्टाफ,दूध संस्था चेअरमन रावसाहेब पाटील,चेअरमन अमोल शिंदे,नितीन दावणे,ग्रामसेवक राजू धनगर,ग्रामपंचायत लिपिक रामशेखर पाटील,गजेंद्र कांबळे अदी उपस्थित होते. यावेळी मल्लिकार्जून सेवा संस्था लिंगनुरचे सचिव संदीप पाटील यांनी आभार मानले.