कोल्हापूर प्रतिनिधी : इंडियन डेअरी असोसिएशन व ‘गोकुळ’चे संचालक, थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार,युथ डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष डॉ. चेतन नरके यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. देश राज्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते,कला-क्रिडा,सामाजिक,राजकीय व सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉ.चेतन नरके यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ.चेतन नरके यांनी गेल्या चार-पाच वर्षात दुधासह वेगवेगळ्या विषयात काम करत असताना जिल्ह्यात जिवाभावाच्या माणसांशी नाते दृढ केले आहे. त्यामुळे आज वाढदिनी छत्रपती शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर सभागृहात सकाळी आठपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मित्र परिवार व हितचिंतक आले होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय मंत्री नारायण राणे,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,वनमंत्री सुधीर मनगुंटीवार,कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे,कॉंग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे,खासदार धनंजय महाडिक,माजी मंत्री राजेश टोपे,शिवसेना नेते खासदार संजय राऊत,शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे,आमदार पी.एन.पाटील,कॉंग्रेस नेते शशी थरूर,माजी आमदार महादेवराव महाडिक,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी आमदार के.पी.पाटील आणि इंडिअन डेअरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे,ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील,बाबासाहेब चौगले,प्रकाश पाटील,अमरसिंह पाटील,बयाजी शेळके,रणजीत पाटील,शशिकांत पाटील-चुयेकर, अभिजित तायशेटे,यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील,कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष संभाजीराव पाटील,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता पाटील,करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य तानाजी आंग्रे,मारुती परतकर,पी.जी.शिंदे, बाबासाहेब देवकर,आर के पोवार,रामराजे कुपेकर यांच्यासह गोकुळ,जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
तर वाढदिवसाच्या निमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून वृक्षारोपण,आरोग्य, नेत्र चिकित्सा,रक्तदान शिबीर अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.