Home व्यवसाय गडहिंग्लजमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ‘क्यू आर कोड’ चे वाटप

गडहिंग्लजमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ‘क्यू आर कोड’ चे वाटप

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, उद्योग व व्यावसायिकांना क्यूआर कोड देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गडहिंग्लज शहरातील छोटे-मोठे दुकानदार,व्यापारी,उद्योजक व व्यावसायिकांना ‘क्यू आर कोड’ चे वाटप झाले. त्यानंतर दिवसभर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिकाऱ्यांनी फिरून मुख्य बाजारपेठेतील भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार,लॉन्ड्री,सलून, औषध विक्रेते व इतर व्यावसायिकांना क्यूआर कोडचे वाटप केले.

यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी ही शेतकऱ्यांची बँक आहे. तसेच ‘क्यू आर कोड’ च्या दैनंदिन पिग्मी भिशीच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यापारी,दुकानदार,उद्योग, व्यवसायिक,उद्योजक,विक्रेते यांची नाळ बँकेशी घट्ट जोडली जाईल. बँकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या क्यूआर कोड मोहिमेत स्वतःला झोकून देऊन काम करावे. सुरुवातीला गडहिंग्लज शहर, त्या पाठोपाठ तालुक्यातील मोठी गावे आणि मग ग्रामीण भागात या पद्धतीने ही मोहीम यशस्वी केली जाईल.

केंद्र कार्यालयात माहिती व तक्रार निवारण कक्ष…!

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, बँकेने मोहीम हाती घेतलेल्या क्यूआर कोडचे ॲक्टिवेशन अवघ्या एक दिवसातच होणार आहे. त्याच्या चौकशी, माहिती देण्यासाठी आणि तक्रार निवारणासाठी केंद्र कार्यालयात एक स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक संतोष पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे,माजी उपनगराध्यक्ष किराणअण्णा कदम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील-गिजवणेकर,हरूण सय्यद,सिद्धार्थ बन्ने,बाळासाहेब देसाई- मंचेकर,सदानंद पाटील, गुंडेराव पाटील,रश्मीराज देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment