Home Uncategorized गडहिंग्लजमध्ये सहा जूनपासून फुटबॉल स्पर्धा;शिवराज-युनायटेड ‘डेव्हलपमेंट’ लीग : उद्यापासून निवड चाचणी

गडहिंग्लजमध्ये सहा जूनपासून फुटबॉल स्पर्धा;शिवराज-युनायटेड ‘डेव्हलपमेंट’ लीग : उद्यापासून निवड चाचणी

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे एकवीस,एकोणीस,सतरा आणि पंधरा वर्षाखालील खेळाडूसांठी ‘डेव्हलपमेंन्ट’ लीग फुटबॉल स्पर्धा होणार आहे. एम.आर.हायस्कुलच्या मैदानावर खेळाडू निवडण्यासाठी उद्या (ता. २९) पासून निवड चाचणी आहे. युवा आणि कुमार खेळाडूंना सामने खेळण्याची अधिक संधी मिळावी यासाठी गुरुवार (ता.६ जून) पासून ‘लिग कम नॉकआऊट’ पध्दतीने ही स्पर्धा ११ जून अखेर होईल. स्पर्धेसाठी रोख अर्ध्या लाखाची बक्षीसे आहेत. स्पर्धेचे यंदाचे अकरावे वर्ष आहे.

वरिष्ठ खेळाडूंना स्पर्धां खेळण्याच्या अनेक संधी आहेत. तुलनेत युवा आणि कुमार खेळाडूंना संधी खुपच कमी आहेत. ही उणीव लक्षात घेऊन खेळाडू घडविण्यासाठी ही ‘डेव्हलमेंन्ट लिग’ ही स्पर्धा होत आहे. हि संकल्पना घेऊन सन २०१२ पासून गडहिंग्लज प्रिमियर लीग (जीपीएल) हि स्पर्धा सुरु केली. कोरोनात दोन वर्षे हि स्पर्धा झाली नाही. गेल्या तीन वर्षापुर्वी या स्पर्धेचे स्वरूप बदलून रिलायन्स फौंडेशनच्या धर्तीवर ‘डेव्हलपमेंन्ट लीग’ स्पर्धा सुरु केली. गडहिंग्लजसह ग्रामीण भागातून खेळाडू यासाठी निवडण्यात येतील. चार दिवस एम.आर.हायस्कुलच्या मैदानावर सायंकाळच्या सत्रातील निवड चाचणीतून हे ९० खेळाडू निवडले जातील. त्यांची शनिवारी (ता. १ जून) बोलीद्वारे सहा संघात विभागणी होईल. निवडलेल्या खेळाडूंना किट देण्यात येईल.

सहा संघाची प्रत्येकी तीन याप्रमाणे दोन गटात विभागणी करुन लिग सामने होतील. गुणानुक्रमे अव्वल दोन संघ सुपरलिगसाठी पात्र ठरतील. रोज सायंकाळच्या सत्रात दोन सामने खेळविण्यात येतील. वयोगटाखालील खेळाडू असल्याने मैदानाचा आकारही लहान ठेवण्यात येणार आहे. मंगळवाऱी (ता. ११) सांयकाळी साडे चार वाजता अंतिम सामना होईल. या संधीचा फुटबॉलपटूंनी लाभ घ्यावा असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद,शिवराज विद्या संकुलाचे प्रमुख प्रा.किसनराव कुराडे, सचिव प्रा.डॉ.अनिल कुराडे यांनी केले आहे. स्पर्धा समन्वयक रोहित साळोखे, अनिकेत कोले आणि सहकारी नियोजन करीत आहेत.

उत्कृष्ट खेळाडूंची निवड
स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडूंना निवडून २१, १९, १७, १५ वर्षाखालील ‘डेव्हलपमेंन्ट’ संघ केला जाणार आहे. या खेळाडूंना वर्षभर दर्जेदार प्रशिक्षणासह मोफत संपुर्ण क्रीडासाहित्य दिले जाईल. परगावच्या विविध स्पर्धा, निवड चाचणीसाठी या खेळाडूंना पाठविण्यात येणार आहे.

Related Posts

Leave a Comment