गडहिंग्लज प्रतिनिधी : शिवराज युनायटेड फुटबॉल ‘डेव्हलपमेंट’ लीगसाठी खेळाडूंच्या बोलीचा कार्यक्रम उत्कंठावर्धक वातावरणात दोन तास रंगला. फुटबॉलपटू सौरभ मोहिते ( १२००) अमर गवळी (१०००),आर्यन दळवी, यश पाटील ( ८००) गुण मिळवून हिरो ठरले. पाठोपाठ श्रवण जाधव,धीरज कुरबेट्टी, सुरज हनिमनाळे यांनी प्रत्येकी ५०० गुण मिळवत लक्षवेधी ठरले. एकुण सहा संघासाठी ९० फुटबॉलपटूंवर नगरपालिकेच्या प्रांगणात ही बोली लागली. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे गुरुवारपासून ही लीग होणार आहे.
शिवराज विद्या संकुलाचे प्रा.विश्वजीत कुराडे यांच्याहस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. सहा संघाचे किटचे अनावरण युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद,संघर्षचे गुंडू पाटील, श्रेयस-अर्थवचे नंदू पाटील,अलीखान पठाण,गौस मकानदार,नगरपालिकेचे सागर यावारी यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षक म्हणून सौरभ पाटील,यासीन नदाफ,ओमकार सुतार,सुल्तान शेख,तानाजी देवेकर,महेश सुतार यांची ड्रॉ मधून निवड झाली. कर्णधार म्हणून आर्यन दळवी,सुमित कांबळे,पवन गुंठे,हर्षल कुरळे,यश पाटील,सौरभ मोहिते यांना निवडण्यात आले. गुडूं पाटील यांचे भाषण झाले.
सौरभ मोहितेने सर्वाधिक गुण मिळवून बाजी मारली. चांगले खेळाडू घेण्यासाठी संघ मालकात चढाओढ रंगली होती. पंधरा,सतरा,एकोणीस आणि एकवीस वर्षाखालील अशा नव्वद खेळाडूंची बोली लागली. खेळाडूंसाठी बोली किती लागणार याची उत्सुकता दिसली. अभिजित चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी अरुण पाटील,समन्वयक अनिकेत कोले,अभिषेक पोवार,ओमकार जाधव यांच्यासह खेळाडू,पालक उपस्थित होते.सौरभ जाधव,प्रनाम प्रसादी यांनी गुणांचे निरीक्षण केले. ललित शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. रोहित साळोखे यांनी आभार मानले.
पालक, माजी खेळाडूंचे संघ नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही डेव्हलपमेंट फुटबॉल लीग होत आहे. या संघाच्या मालकीसाठी युनायटेडच्या पालकांनी गुफा गार्डीयन,माजी खेळाडूंनी रायझिंग स्टार्स,इफा लायन्स,दादा जीएम,श्रेयस-अर्थव वॉरियर्स संघाची मालकी स्वीकारली. स्थानिक प्रतिभावंत फुटबॉलपटूंना बळ देण्यासाठी पालक, माजी खेळाडूंचा सहभाग कौतुकाचा विषय ठरला.