गडहिंग्लज प्रतिनिधी : ‘शिवसेना'(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गडहिंग्लज तालुकाप्रमुखपदी ‘अजित खोत’ यांची निवड झाली असून कडगाव-गिजवणे,नुल-हसुरचंपू व गडहिंग्लज शहर कार्यक्षेत्राची जबाबदारी श्री.खोत यांच्यावर पक्षाने सोपवली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये उपजिल्हाप्रमुख,क्षेत्रप्रमुख,तालुका संघटक व तालुका प्रमुख अशी पदाधिकाऱ्यांची यादी मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली. नूतन निवडीत वडरगे(ता-गडहिंग्लज)गावचे माजी उपसरपंच अजित खोत यांची शिवसेना गडहिंग्लज तालुकाप्रमुखपदी वर्णी लागली आहे.
पदाधिकारी निवडीनंतर अजित खोत म्हणाले की पक्षाने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवत मोठी जबाबदारी दिली आहे. येथून पुढे सर्वांना विश्वासात घेऊन पक्षाचे विचार व ध्येय खेडोपाडी,तळागाळापर्यंत पोहचवणार असून पदाला साजेसे काम करून माझी निवड सार्थ ठरविण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहणार आहे.