गडहिंग्लज प्रतिनिधी : संत गजानन महाराज शिक्षण समूहातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आरोग्य तंदुरुस्त रहावे, त्यांना आरोग्याच्या बाबतीत कोणतीच आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी शासकीय योजने व्यतिरिक्त इतर आजारावरील उपचार व रक्त चाचण्यात तीस ते पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे. यासाठी ‘एस.जी.एम.हेल्थकेअर’ योजनेची सुरुवात करीत असून ही योजना संस्थेच्या हसूरवाडी व महागाव येथील दोन्ही हॉस्पिटलमध्ये लागू असेल. समुहातील साडे सातशे कर्मचारी,पाच हजार विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्याना या सवलतीद्वारे एक आरोग्य सुरक्षा कवच प्रदान करीत असल्याचे माहिती विस्वस्त डॉ. यशवंत चव्हाण यांनी महागाव (तालुका-गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहात आयोजित योजनेच्या शुभारंभ प्रसंगी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी येथील प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉ.शेखर भिसे म्हणाले “सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आरोग्याकडे लक्ष देणे कठीण होत आहेत. तणाव,चिंता नैराश्याच्या प्रमाणात वाढ झाले आहे. जीवन शैलीतील बदल, व्यसनाधीनता,अपुरी झोप,पोषण आहाराची कमतरता या साऱ्या गोष्टी हृदयविकाराच्या समस्या वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत यासाठी दररोज एक तास व्यायाम,योगासन,आहारातील समतोलपणा ठेवला पाहिजे. हृदयाची ठोके अनियमित वाढणे,छाती धडधडणे,दम लागणे,दरदरुन घाम येणे यासारख्या समस्याकडे दुर्लक्ष न करता लगेच तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी व आपल्या हृदयाची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. मान्यवराच्या हस्ते हेल्थ कार्ड प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यावेळी समुहातील काही कर्मचाऱ्यांना योजनेच्या कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी विविध विभागातील डॉक्टरांनी हॉस्पिटलमधील विविध योजना उपचार व निदान बाबत माहिती दिली दरम्यान आरोग्य समस्या बाबत कर्मचाऱ्याकडून आलेल्या प्रश्नालाही तज्ञाने मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.प्रतिभा चव्हाण,डॉ.सुरेखा चव्हाण,डॉ.एस.एच सावंत,डॉ.मंगल मोरबाळे,डॉ प्रीती पाटील,डॉ.राजदीप होडगे,डॉ.माधव पटाडे,प्रा.रोहिणी पाटील,विकास अधिकारी प्रा.डी. बी.केस्ती,डॉ.एस.जी.किल्लेदार,डॉ. नंदकुमार सौंधी,प्रा.अजिंक्य चव्हाण यांच्यासह हॉस्पिटल मधील डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.प्रा.अमरसिंह फरकटे यांनी आभार मानले.
लवकरच बायपास युनिटची सुरुवात…
यावेळी विश्वस्त संजय चव्हाण म्हणाले येथे हृदय रुग्णांसाठी सुरु असलेले आत्यधुनिक कॕथलॕबला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर रुग्णांच्या सोयीसाठी लवकरच बायपास शस्त्रक्रिया युनिट सुरु करीत असल्याचे सांगून विभागात राहणाऱ्या गोवा राज्यातील रुग्णांकरीता असलेली मोफत शासकीय योजनेचा लाभ लवकरच येथील हॉस्पिटलमध्ये घेता येणार आहे. तसेच येथील कॅन्सर निदान सेंटरमधील आत्याधुनिक तंत्रज्ञ व सुविधाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यानी यावेळी केले.