Home सामाजिक श्रीमती पद्मश्री सुभाष गुरव यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

श्रीमती पद्मश्री सुभाष गुरव यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शिक्षकांना देण्यात येणारा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२३ गडहिंग्लज तालुक्यातील केंद्रशाळा भडगाव येथे कार्यरत असणाऱ्या पद्मश्री सुभाष गुरव यांना नामदार दीपक केसरकर (मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री) कोल्हापूर यांचे शुभ हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तालुक्यातील शिक्षकांकडून प्रथम स्वयंमूल्यमापन प्रस्तावानुसार अधिक गुण प्राप्त शिक्षकांच्या शाळेमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन बीटस्तरावर, तालुकास्तरावर पाहणी करण्यात आली. तसेच आदलाबदल करून त्रयस्थ बाह्यमूल्यमापन समितीच्या शिफारशीनुसार पात्र शिक्षकांची ५० गुणांची मुलाखती घेण्यात आल्या. यातून पद्मश्री गुरव यांची पुरस्काराकरिता निवड करण्यात आली.

पद्मश्री गुरव वीस वर्षे जिल्हा परिषदेतील शाळातून ज्ञानदानाचे काम करत आहेत. त्यांचे शिक्षण एम.एस.सी. फिजिक्स डी.एड.डी.एस.एम असून केंद्रशासन पुरस्कृत एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षा,शासकीय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षेत त्यांच्या कित्येक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
सन २०१८ मध्ये परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेवर जिल्हा परिषद सर्व शिक्षकांमधून इस्त्रो भेट देण्याकरता प्रथम क्रमांकाने त्यांची निवड झाली होती. त्यांनी विद्यार्थिनीसह विमानप्रवासासह इस्रोला भेट दिली आहे. फुलोरा हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यांचे वर्तमानपत्रातून लेखही प्रसिद्ध झाले आहेत. तर कोरोना सर्वेक्षण, कोविड योद्धा,पूरग्रस्तांना मदत, मुख्यमंत्री सहायता निधी,एड्सग्रस्त मदत,निवारा बालगृह मदतनीधीतही भरीव काम केले आहे. महिला बचत गटनिर्मिती व मार्गदर्शनाचे काम हे त्यांनी केले आहे.

नामदार दीपक केसरकर (मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री) कोल्हापूर यांचे शुभ हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. खासदार धैर्यशील माने, शिक्षक आमदार जयंतराव आसगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील,माध्यमिक शिक्षणकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणअधिकारी मीना शेंडकर,मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, सर्व उपमुख्य कार्यकारी व विभागप्रमुख जिल्हा परिषद, कोल्हापूर यांचे उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

Related Posts

Leave a Comment