Home Uncategorized मंत्री हसन मुश्रीफांना ‘केडीसीसी’ अध्यक्षपदाचा ‘राजीनामा’ देऊ देणार नाही : राष्ट्रवादीच्या बैठकीत कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका

मंत्री हसन मुश्रीफांना ‘केडीसीसी’ अध्यक्षपदाचा ‘राजीनामा’ देऊ देणार नाही : राष्ट्रवादीच्या बैठकीत कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका

by Nitin More

कोल्हापूर प्रतिनिधी : मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे, असे सुतोवाच केले आहे. पण मंत्री श्री. मुश्रीफ यांना केडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ देणार नाही. अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर होते.

बैठकीत बोलताना माजी आ. के.पी. पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे सर्वसामान्य गोरगरिब शेतकऱ्यांचे नेतृत्व आहे. केडीसीसी बँकेच्या कारभाराच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी कल्याणाचा ध्यास सातत्याने घेतला आहे. बँकेच्या माध्यमातून शेतकरी कल्याणाच्या विविध योजना व धोरणे राबवून त्यानी संबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थैर्य मिळवून दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर म्हणाले, दहा वर्षाच्या आधी बँकेवर सहा वर्ष प्रशासक होते. अलीकडच्या दहा वर्षात संचालक मंडळाची सत्ता आहे. या कारकिर्दीत मंत्री श्री.मुश्रीफ यांनी बँक नावारूपाला आणली आहे.

यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केडीसीसी बँक व श्री.मुश्रीफ यांच्या अनुषंगाने मांडलेल्या भावना अशा…

□ कोल्हापूर जिल्ह्याच्या कृषी-औद्योगिक क्रांतीत केडीसीसीचे योगदान मोठे..!

□ सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला उद्योजक बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील व इतर महामंडळाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या..!

□ लाडक्या बहिणींना स्वयंरोजगार व उद्योग-व्यवसायासाठी अल्प व्याजदरात कर्ज योजना…!

□ पाच लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने

□ ऊस उत्पन्न वाढीतून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी ऊस शेतीमधील ए.आय. तंत्रज्ञान वापरासाठी एक कोटींची तरतूद…!

बैठकीला माजी आमदार के.पी. पाटील,कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील- जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे,महिला जिल्हाध्यक्षा शितलताई फराकटे,शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, बाळासाहेब देशमुख,नितीन दिंडे, हर्षवर्धन चव्हाण,संभाजीराव पवार, विश्वनाथ कुंभार,आप्पासाहेब धनवडे,शिरीष देसाई,विकासराव पाटील,सुनील भिऊंगडे,विनय पाटील,भिकाजी एकल, हर्षवर्धन चव्हाण,संतोष धुमाळ,गणी ताम्हणकर,निहाल कलावंत,युवराज पाटील,दाजी पाटील,अर्जुन चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment