Home Uncategorized वडरगेत ‘दोन’ दिवसात ‘दोन’ तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू : मनसेचे जिल्हासचिव वैभव माळवेंचे निधन

वडरगेत ‘दोन’ दिवसात ‘दोन’ तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू : मनसेचे जिल्हासचिव वैभव माळवेंचे निधन

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : वडरगे (ता-गडहिंग्लज) येथे ‘दोन’ दिवसात ‘दोन’ तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला असून काल शुभम धनाजी आडावकर(वय-२३) तर आज मनसेचे जिल्हासचिव वैभव मारुती माळवे (रा-वडरगे,वय-३६) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सलग दोन दिवसात दोन तरुणांचा मृत्यू झालेने वडरगे ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.

दोन दिवसात वडरगे येथे शुभम आडावकर व वैभव माळवी या दोन तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अचानक झालेल्या दोन तरुणांच्या मृत्यूमूळे गावाकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. शुभम सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सराव करत असताना ‘शुभम’ यास मृत्यूने गाठले. तर आज सकाळी ११ वाजता वैभव माळवेस घरात चक्कर आलेने गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच हृदयविकाराने मृत्यू झालेचे सांगितले.

वैभव पदवीधर असून तो मुंबईमध्ये कुरियर कपंनीत नोकरीस होता पण काही महिन्यापासून तो गावीच होता. आषाढी एकादशीच्या निमित्ताने तो पंढरपूर वारीला गेला होता. त्यानंतर तो आजारी होता. किरकोळ आजाराचे निमित्त होते पण वैभव यास चक्कर आली आणि त्याची प्राणज्योत मावळली. वैभव मनसेचे ग्रामीणचे जिल्हासचिव होते तर मनसेच्या वरिष्ठांशी खूप जिवाळ्याचे सबंध होते त्यांच्या अचानक ‘एक्झिट’ मूळे गावासह मित्रपरिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Posts

Leave a Comment