Home Uncategorized ..अन् ‘शुभम’ चे सैन्यदलात जाण्याचे ‘स्वप्न’ राहीले अधुरे : वडरगेच्या शुभमचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

..अन् ‘शुभम’ चे सैन्यदलात जाण्याचे ‘स्वप्न’ राहीले अधुरे : वडरगेच्या शुभमचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : वडरगे(ता-गडहिंग्लज) येथील शुभम धनाजी आडावकर आज(ता-२२) सकाळी सैन्यदलात भरती होण्याच्या उद्देशाने धावण्याचा सराव करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून त्याच्या आशा अचानक जाण्याने वडरगे गावासह मित्र परिवारवर शोककळा पसरली आहे.

सैन्यदलात भरती होण्याच्या उद्देशाने धावण्याचा सराव करत असताना वडरगे येथील शुभम आडवकर(वय-२३) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुभम याने आर्मीची परीक्षा दिली होती. त्यात तो पास झाला होता तर त्याच्या शारीरिक चाचण्या राहिल्या होत्या. त्यासाठी तो दररोज वडरगे येथे सराव करत होता. नेहमीप्रमाणे तो आज पहाटे पाच वाजता धावण्यासाठी बहिरेवाडीकडे गेला पण वाटेतच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो रस्त्याच्या कडेला कोसळला. सदरची माहिती गावातील लोकांना समजलेनंतर शुभम यास गावातील खाजगी दवाखान्यात आणण्यात आले. पण खुप उशीर झाला होता. जाग्यावरच त्याचा मृत्यू झाला होता.

शुभम नावाप्रमाणेच गुणवंत,चांगल्या स्वभावाचा व मनमिळावू होता. पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून आई-वडिलांना शेतात मदत करत सैन्य दल व पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. आई-वडिलांनाही तो भरती होईल असा विश्वास होता. आई-वडिलही त्याला खूप सहकार्य करायचे. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्याचा आज पहाटे सरावा दरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.

Related Posts

Leave a Comment