Home Uncategorized गडहिंग्लज येथील ‘मनोहर नांगरे’ यांचे मरणोत्तर नेत्रदान : गडहिंग्लज शहरातील सातवे नेत्रदान

गडहिंग्लज येथील ‘मनोहर नांगरे’ यांचे मरणोत्तर नेत्रदान : गडहिंग्लज शहरातील सातवे नेत्रदान

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज मोहिते नगरमधील मनोहर भरमा नांगरे (वय ८५) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. गडहिंग्लज शहरातील हे सातवे नेत्रदान आहे. नांगरे कुटुंबीयांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या या निर्णयामुळे नेत्रदान चळवळीच्या व्यवस्थेतील रुपांतराच्या प्रक्रियेला बळ मिळाले आहे.

मनोहर नांगरे यांना मंगळवारी (ता.१३) रात्री नऊच्या सुमारास हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणले होते. पण, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. नांगरे यांचे जावई विजय पोवार (शिप्पूर तर्फ आजरा, ता. गडहिंग्लज) यांनी आपल्या वडीलांचे मरणोत्तर नेत्रदान केले आहे. त्यामुळे त्यांनी सासऱ्यांचेही मरणोत्तर नेत्रदान करण्याबाबत कुटुंबीयांत चर्चा केली. सर्वांनी संमती दिल्यानंतर येथील अंकूर आय बँकेशी संपर्क साधण्यात आला. ‘अंकूर’च्या पथकाने नांगरे यांच्या घरी जावून नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. मनोहर नांगरे यांच्या मागे मुलगा,दोन मुली,सून,जावई,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.१६) सकाळी नऊला आहे.

Related Posts

Leave a Comment