गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज शहरातील शेंद्री रोड,काळभैरी रोड विभागातील वीजबिले वाटप करा, विलंबामुळे दंडात्मक कारवाई झाल्यास आंदोलन करू अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेने विद्युत महामंडळाकडे निवेदनद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे कि गडहिंग्लज शहरातील काळभैरी रोड,लाखे नगर,माळगी वसाहत,शाहू कॉलनी,शेंद्री रोड,मेठाचा मार्ग व धनगर देऊळ परिसरात तुम्ही नेमून दिलेल्या विज बिलांचे रीडिंग दर महिन्याच्या 18 किंवा 19 तारखेपर्यंत घेतात व 20 किंवा 21 तारखेपर्यंत वरील परिसरातील ग्राहकांना वीजबिले लेखी स्वरूपात देतात,
एप्रिल महिन्यातील बिलांचे रीडिंग 18 19 तारखेला घेऊन सुद्धा आज पर्यंत ग्राहकांना लेखी विज बिल पोहोच झालेली नाहीत. त्यामुळे विज बिल भरण्याची मुदत संपूनही वीज बिल मिळाले नसल्यामुळे लोकांना वेळेत विज बिल भरता आलेली नाही त्यामुळे नाहक दंडाचा भुर्दंड ग्राहकांवर बसत असून यास सर्वस्वी आपण व आपली प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहेत. यंत्रणांच्या चुकीमुळे नाहक जनतेला त्रास सहन करावा लागत असून याबाबत जबाबदार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी ही विनंती. तसेच विलंबा आकारात सूट द्यावी अन्यथा संघटना तीव्र आंदोलन छेडेल व त्या सर्वस्वी आपण प्रशासन जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष अविनाश ताशिलदार,बाजीराव भोसले,भीमगोंडा पाटील,अशोक बार्देस्कर, शशिकांत मोहिते यांच्या सह्या आहेत.