गडहिंग्लज प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळावर बोईंग 737 व एअरबस 320 सारखी मोठी विमाने लॅंडिगसाठी आणि उड्डाणासाठी, नाईट लॅंडिग,ओव्हरनाईट पार्किंग, एव्हिएशन फ्युएल फिलिंग स्टेशन, 3000 मीटर धावपट्टी सुविधेसह अत्याधुनिकीकरण करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ईमेल पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हंटले आहे कि कोल्हापूर शहर सातारा,सांगली, कोल्हापूर,सोलापूर,सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे मध्यवर्ती औद्योगिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र आहे. येथे भारतातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आई अंबाबाईचे प्राचीन मंदिर असुन पन्हाळगड,विशाळगड आणि सामानगड असे किल्ले आहेत. तर कोल्हापुर व कागलला पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. तसेच कृषीप्रधान साखरपट्टा असून पर्यटकांचे,उद्योगपतींचे व प्रवाशांचे दररोज मुंबई,बेंगलोर,दिल्ली, अहमदाबाद,भोपाळ,तिरुपती येथे आणि साॅफ्टवेअर अभियंत्यांचे आस्ट्रेलिया,अमेरिकेतील सिलिकाॅन व्हॅली येथे मोठ्या प्रमाणावर जाणे-येणे असते. पण अत्याधुनिक सोयीसुविधेअभावी कोल्हापूर विमानतळावर खुपच गैरसोय होत आहे. तेंव्हा देशातील मेट्रो व मेगा सिटी कनेक्टिव्हिटी करिता इंडिगो, स्टार एअरलाईन्स , इंडियन एअर लाईन्स सारख्या मोठ्या विमान कंपन्यांच्या एक्झिक्युटिव्ह सेवेसह, बोईंग 737,एअरबस 320 सारखी मोठी विमाने लॅंडिगसाठी,एव्हिएशन फ्युएल फिलिंग स्टेशन,नाईट लॅंडिग, ओव्हर नाईट पार्किंग,3000मीटर धावपट्टी सुविधेसह अत्याधुनिकीकरण करावे