Home Uncategorized गडहिंग्लज ‘गोडसाखर’ च्या कामगारांचे ‘पाच’ महिन्यांचे पगार जमा : मंत्री हसन मुश्रीफांच्या सहकार्यामुळे संचालक मंडळाच्या पाठपुराव्याला यश..!

गडहिंग्लज ‘गोडसाखर’ च्या कामगारांचे ‘पाच’ महिन्यांचे पगार जमा : मंत्री हसन मुश्रीफांच्या सहकार्यामुळे संचालक मंडळाच्या पाठपुराव्याला यश..!

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेड,हरळी येथील कामगारांचे मागील थकीत पगारापैकी पाच महिन्यांच्या पगाराची रक्कम मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भरीव सहकार्याने व संचालक मंडळाच्या पाठपुराव्यामुळे एकाच वेळी पाच महिन्यांच्या पगाराची रक्कम कर्मचाऱ्यांच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा कारखाना साईट बँकेत जमा केली आहे.

मागील पगाराची रक्कम अदा केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सिझन २०२४-२५ सुरु करणेसाठीची हंगाम पूर्व कामे कामगाऱ्यांच्याकडून युध्द पातळीवर सुरु झाली असून हंगाम यशस्वी करणेसाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे. मंगळवार दिनांक २४/०९/२०२४ तोडणी वाहतुक यंत्रणेमधील प्रतिनिधींना अॅडव्हान्स रक्कमेचे वाटप केले व आज दिनांक २५/०९/२०२४ रोजी कामगारांचे एकाच वेळी पाच महिन्याच्या पगाराची रक्कम दिल्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.

Related Posts

Leave a Comment