गडहिंग्लज प्रतिनिधी : हलकर्णी (ता-गडहिंग्लज) जिल्हापरिषद मतदारसंघातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘मानसिंग खोराटेंना’ पाठींबा दिला असून खोराटे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या विकासात्मक धोरणांना पाठिंबा देत पदाधिकाऱ्यांनी विधानसभेत पाठवण्याचा संकल्प केला आहे.
इदरगुंच्चीचे विद्यमान सरपंच जनाबाई रेमजी,उपसरपंच मंजुळा देसाई,बलभीम विकास सेवा संस्था येणंचवंडी चेअरमन,व्हाईस चेअरमन व संचालक, कडलगे उपसरपंच आनंदराव जाधव,शंकर केसरोळी, संतोष कळसगौडा,भीमराव बागी,मंगल नाईक,सुनिता सनदी चेअरमन वाकडा देवी विकास संस्था व दूध संस्था आरळगुंडी,दूरदंडेश्वर विकास संस्था चेअरमन व व्हाईस चेअरमन व संचालक,जयश्री राजू यादगुंडे,नांगनूर माजी सरपंच सुप्रिया कांबळे,सदस्य माधुरी कासारकर, सदस्य कृष्णा तोडकर,शिवानंद मुरबोळे,प्रतिक कोळी,येणेचंवडी सरपंच दिपाली कांबळे,उपसरपंच जयश्री भोसले, सदस्य पूनम विजय शिंत्रे,रवींद्र शिवाजी कुराडे,मीनाक्षी झळके,सूर्यकांत मिरजे यांच्यासह हलकर्णी पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्त्यांनी श्री.खोराटे यांना जाहीर पाठिबा दिला.