गडहिंग्लज प्रतिनिधी : शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारा ‘एस.जी.एम’ समूह गोरगोरीब-सर्वसामान्य रुग्णांचा आधारवड बनून उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच हॉस्पिटलमार्फत सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्या आहेत. याचेच एक पुढचे पाऊल म्हणजे गुरुवार(ता-26) रोजी दुपारी 12 वाजता संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल,महागाव येथे ‘एम.आर.आय’ सेवेचा प्रारंभ केला जाणार आहे.
‘एम.आर.आय’ सेवेचा शुभारंभ रमेश शिवाजी चव्हाण (IAS) सी.ई.ओ. (महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना) यांच्या शुभ हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.सुप्रिया देशमुख-देसाई (सिव्हील सर्जन,कोल्हापूर) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. डॉ.आण्णासाहेब चव्हाण (संस्थापक चेअरमन, एस.जी.एम. ग्रुप) असणार आहेत.
कार्यक्रमास विजयमाला चव्हाण,डॉ. यशवंत चव्हाण (मेडिकल डायरेक्टर),डॉ. संजय चव्हाण (विश्वस्त,एस.जी.एम. ग्रुप),डॉ.प्रतिभा चव्हाण (विश्वस्त,एस.जी.एम. ग्रुप),डॉ.सुरेखा चव्हाण (विश्वस्त, एस.जी.एम.ग्रुप)अॅड. बाळासाहेब चव्हाण(सचिव)शशिकांत पाटील चुयेकर (संचालक,गोकुळ दूध संघ),तेजस्विनी श.पाटील-चुयेकर,बाळकू शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित असणार आहेत.