Home Uncategorized शिवराज महाविद्यालयामध्ये ‘अवकाश’ दिनानिमित्त भित्तीपत्रक स्पर्धा उत्साहात संपन्न

शिवराज महाविद्यालयामध्ये ‘अवकाश’ दिनानिमित्त भित्तीपत्रक स्पर्धा उत्साहात संपन्न

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : शिवराज महाविद्यालयामध्ये विज्ञान मंडळ व भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने २३ ऑगस्ट रोजी पहिला अवकाशदिन साजरा करण्यात आला. अवकाशदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांकरीता अवकाशासंबंधी विविध विषयावरती भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेकरीता एकूण २४ भित्तीपत्रके आली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका प्रा.बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या उ‌द्घाटनानंतर स्पर्धकाना मार्गदर्शन करताना परीक्षक म्हणून माजी प्राचार्य डॉ.जोडगुद्री यांनी अवकाशात अन्नधान्य वाहून नेण्यासंदर्भात सुरु असणाऱ्या संशोधनाबद्दल तसेच यंत्रमानव अवकाशामध्ये कशा पध्दतीने झेपावता येतील यासबंधीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच माजी विभागप्रमुख डॉ. कुलकर्णी यांनी ज्योतिष व खगोलशास्त्रमधील फरक स्पष्ट करताना सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाचे प्रकार कसे दिसून येतात, त्याचा परिणाम कसा होतो व भारतातील जुन्या नामांकीत नालंदा व तक्षशिला विद्यापीठामध्ये त्यासंबंधी कसे अध्ययन होते यासंबधी सविस्तर मार्गदर्शन केले.

सर्व भित्तीपत्रकातून उत्कृष्ठ अशी भित्तीपत्रके निवडून त्याना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक :- साहिल पाटील व मेधन हुंदळेकर,द्वितीय क्रमांक:- करण कांबळे व श्रेयस शिऊडकर, तृतिय कमांक-महेक मुल्ला, चतुर्थ क्रमांक:- भक्ती गोटे यांनी पटकावला. स्पर्धेचे परिक्षक म्हणून माजी प्राचार्य डॉ.एस. ए.जोडगुद्री व माजी विभागप्रमुख प्रा. बी.एम.कुलकर्णी यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अँड‌. दिग्विजय कुराडे, प्राचार्य.डॉ.एस.एम. कदम,संचालक बसवराज आजरी, प्रा.विश्वजीत कुराडे,पर्यवेक्षक प्रा.टी. व्ही.चौगुले,नॅक समन्वयक प्रा.के.जे. अदाटे, प्रा.एस.एस.पंगम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पी.ए. सरनोबत यांनी केले व आभार डॉ. आर.एम.शेडम यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.गौरव पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment