गडहिंग्लज प्रतिनिधी : कुंभार समाज हा अतिशय कष्टाळू आणि मातीशी नाळ जुळलेला समाज आहे. या समाजासाठी प्रशस्त व सर्व सोयीसुविधायुक्त बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह बांधू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गडहिंग्लजमध्ये कुंभार समाजाच्या संत गोरोबाकाका सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम पालकमंत्री यांच्या २७ लाख रुपये निधीतून झाले आहे. या सभागृहाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, गडहिंग्लज शहरातील कुंभार समाजासाठी प्रशस्त सर्व सोयीसुविधांनीयुक्त बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह ऊभारू. या समाजाने संत गोरोबाकाका सांस्कृतिक सभागृहाचा वापर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यासाठी करावा. या सगळ्यासाठी लागेल ते सहकार्य करू.
जडेयसिध्देश्वर मठाचे अधिपती महंत श्री. सिद्धेश्वर स्वामी म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ संत गोरोबाकाका सांस्कृतिक सभागृह बांधून या समाजाची सेवा केली आहे. त्यांनी सर्वच जाती-धर्माची व समाजाचे प्रेम मिळवलेले आहे. जनतेसाठी २४ तास उपलब्ध असणारे ते नेते आहेत. त्यांचे कामच बोलतय..! असेही ते म्हणाले.
तीन हजार घरकुले बांधणार.. !
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज शहरात घरे नसणाऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. परंतु घरकुल बांधण्यासाठी जागाही उपलब्ध नाही. येथील स्थानिक नेतेमंडळींनी जागा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने जागेचा मोबदला देऊन खरेदी करून त्यावरती तीन हजार घरकुले बांधून देऊ..!
यावेळी सतीश पाटील,विद्याधर गुरबे, प्रकाशभाई पताडे,किरण कदम, बसवराज खणगावे,नरेंद्र भद्रापूर,सिद्धार्थ बन्ने,राहुल शिरकोळे,गुरुप्रसाद नुलकर,सुनील कलाल,संतोष उर्फ आबा मांगले,विनोद बिलावल,वसंतराव यमगेकर,सुरेश कोळकी,महेश सलवादे,गुंडू पाटील,रमेश रिंगणे,हारूण सय्यद,महादेव कुंभार,चंद्रकांत कुंभार,यशवंत कुंभार,सुनील कुंभार,भैरू कुंभार,अशोक कुंभार,रावसाहेब कुंभार,वसंत कुंभार,अनिल कुंभार,प्रकाश कुंभार,संदीप कुंभार,नेताजी कुंभार आदी प्रमुख उपस्थित होते.