Home Uncategorized साधनाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांचे अनोखे ‘गेट-टुगेदर’ : अपंग मित्रास ‘ऑटोमॅटिक टायर फिटिंग मशीन’ केले गिफ्ट.!

साधनाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांचे अनोखे ‘गेट-टुगेदर’ : अपंग मित्रास ‘ऑटोमॅटिक टायर फिटिंग मशीन’ केले गिफ्ट.!

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील साधना हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष १९९८-९९ सालच्या १० वीच्या विद्यार्थ्यांनी ‘गेट टुगेदर’ अनोख्या पध्दतीने साजरे केले. साधनाचे १९९८-९९ सालचे माजी विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर उत्तम कामगिरी करत आहेत. या विध्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम हाती घेत पारंपरिक स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाला फाटा दिला. स्नेहमेळाव्याला वायफळ खर्च न करता गरजू आणि होतकरू मित्राला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेऊन त्याला मदतही केली.

मारुती डोमणे (रा.डोमणेवाडी,गडहिंग्लज) लहानपणापासून अपंग आहे. त्याचे काळभैरी रोड येथे पंक्चर काढण्याचे दुकान असून रोज पंक्चर काढून मिळणाऱ्या पैशातून मारुतीच्या घराची उपजीविका चालते. अशा गरीब पण कष्टाळू अपंग मित्रास वर्ग मित्रांनी वर्गणी काढून ८० हजार रुपयाचे ‘ऑटोमॅटिक टायर फिटिंग मशीन’ विकत घेऊन दिले. मारुती डोमणे अपंग असल्यामुळे त्याला ऑटोमॅटिक टायर फिटींग मशीनची नितांत गरज होती पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तो घेऊन शकत नव्हता. त्याला स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने वर्गमित्रांनी ‘ते’ मशीन गिफ्ट केले.

यावेळी उपप्राचार्य बाळकृष्ण पाटील यांच्यासह जगदीश शिंदे,आलोक तेलवेकर,अविनाश तशीलदार,डॉ.अमर पेडणेकर,डॉ.राकेश बेलगुद्री,डॉ.जॉय कार्व्हालो,राघवेंद्र बालेशगोळ,संतोष तेलंग,अभिषेक गाढवी,नानगोंडा पाटील,विनायक शिंदे आदी मित्र सहभागी होते.

Related Posts

Leave a Comment