Home Uncategorized राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडहिंग्लज तालुका अध्यक्षपदी ‘पृथ्वीराज पाटील’

राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडहिंग्लज तालुका अध्यक्षपदी ‘पृथ्वीराज पाटील’

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडहिंग्लज तालुका अध्यक्षपदी पृथ्वीराज रमेश पाटील(अत्याळ) यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र आज कोल्हापूर येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ,आ.राजेश पाटील,जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अनके वर्षांपासून अत्याळ(ता.गडहिंग्लज) येथील माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील राष्ट्रवादीतून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत. एक कुशल संघटक म्हणून त्यांची ओळख असून त्यांची पक्षा विषयी असणारी निष्ठा व उत्तम कार्याची दखल घेत मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे यांनी गडहिंग्लज तालुका राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी पृथ्वीराज पाटील यांच्याकडे दिली आहे. तर निवडी नंतर पृथ्वीराज पाटील म्हणाले की येथून पुढे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे व विधानसभेला राष्ट्रवादीचा झेंडा चंदगड व कागल मतदारसंघात फडकीवणेसाठी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस अग्रेसर राहील.

Related Posts

Leave a Comment