गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथे महसुलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर आज(शुक्रवार) महसूल भवन गडहिंग्लज येथे संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी तहसीलदार ऋषिकेत शेळके,गटविकास अधिकारी शरद मगर,नायब तहसीलदार विष्णू बुटे,राजेंद्र यादव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गीता कोरे उपस्थित होते.
आरोग्य शिबिरात ९० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर २० जणांनी रक्तदान केले. आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर इंडियन मेडिकल असोसिएशन गडहिंग्लज,गडहिंग्लज लायन्स ब्लड बँक याच्या सहकार्यातून संपन्न झाले.