गडहिंग्लज प्रतिनिधी : हिरण्यकेशी,घटप्रभा,तामपर्णी पूरग्रस्त संघर्ष समिती गडहिंग्लज,आजरा,चंदगड यांच्यावतीने तिन्ही नदीवर असणारे पुलाची उंची वाढविणे व नदीतील गाळ काढणे या व अनेक विषयासाठी १२ ऑगष्टला ११ वाजता रस्ता रोको करणार असलेबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले असून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समिती मार्फत केले आहे.
निवेदनात म्हंटले आहे की गडहिंग्लज,आजरा व चंदगड तालुक्यामधून जाणाऱ्या हिरण्यकेशी,घटप्रभा व ताम्रपर्णी नद्या वाहतात. दरवर्षी त्यावर असणारे पूल अतिवृष्टीने पाण्याखाली जातात त्यामुळे गावा-गावांचा व तालुक्यांचा संपर्क तुटून लोकांचे अतोनात हाल होत आहे. त्याचे एकमेव कारण नदीचे पूर्ण पात्र गाळाने भरल्यामुळे कायम पूर येतो. त्यामुळे नदीच्या पात्राकडे असणारी पिके कुजून चालली आहेत. नदीच्या कडेला असणारी गावे पाण्याखाली गेल्यामुळे घरांची पडझड होत आहे. २०१९,२०२१ आणि २०२४ महापुराचा तडाखा बसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शासन याकडे दुर्लक्ष करत होत असून शासनाला जाग आणण्यासाठी तिन्ही तालुक्यातील शेतकरी,कष्टकरी, कामगार व जनतेंना घेऊन भडगाव(ता-गडहिंग्लज) नदीवरील पुलावर सोमवारी रास्ता रोखो करणार आहोत.
विषय खालील प्रमाणे:-
1) हिरण्यकेशी,घटप्रभा,ताम्रपर्णी नदीवरील पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या सर्व पुलाची उंची वाढविणे.
2) हिरण्यकेशी,घटप्रभा,ताम्रपर्णी नद्यामधील गाळ व वाळू काढून नदीची खोली वाढविणे.
3) पूर बाधीत शेतीचे पंचनामे करून विना अट जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी.
4) अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी.
5) शेतकऱ्यांच्या व सहकारी संस्थाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थाना सरसकट विजमाफी मिळावी.
6) शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण कर्जमाफी व्हावी. रास्ता रोको ठिकाणी आपण निवेदन घेण्यासाठी उपस्थित राहावे.
निवेदनावर बाळेश नाईक,उदय कंदम,श्रीरंग चौगुले,रमेश मगदूम,बाळकृष्ण परीट,महेश उर्फ बंटी कोरी,हिंदूराष नौकुडकर,अरुण पाटील आदींच्या सह्या आहेत.