Home Uncategorized ‘लक्कीकटे’ च्या ‘त्या’ कुटूंबाला गोकुळच्या संचालिका ‘अंजनाताई रेडेकर’ यांनी केली वीस हजारांची मदत..!

‘लक्कीकटे’ च्या ‘त्या’ कुटूंबाला गोकुळच्या संचालिका ‘अंजनाताई रेडेकर’ यांनी केली वीस हजारांची मदत..!

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : लक्कीकटे(ता. चंदगड) येथील शेतकरी बाबू तानाजी मुगारे यांच्या चार म्हैशी विद्युत तारेचा स्पर्श होवून मृत्युमुखी पडल्या. त्यांना गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी भेट देवून तातडीची वीस हजार रुपयांची मदत दिली.

शेतकरी श्री.मुगारे यांनी आपली जनावरे चारावयास सोडली होती. त्यावेळी तुटलेल्या विद्युत तारेतून वीज प्रवाह सुरु होता त्याचा स्पर्श होवून चारीही म्हैशी मृत्युमुखी पडल्या. या घटनेत सदर शेतक-याच्या सर्वच जनावरे दगावल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. सदर घटनेची माहीती मिळताच तातडीने गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली व गोकुळ दुध संघाकडून मदत देण्याचे आश्वासन दिले. तर तातडीची मदत म्हणून स्वतःकडील रोख वीस हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन सदर कुटुंबाला मोठा आधार दिला.

यावेळी गोकुळचे तावरेवाडी चिलिंग सेंटरचे संकलन अधिकारी बापूसाहेब देसाई,विनायक पाटील यांच्यासह सुपरवायझर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment